الذاريات
Adh-Dhariyat
The Winnowing Winds
وَٱلذَّٰرِيَـٰتِ ذَرْوًۭا
wal-dhāriyāti dharwan
१. शपथ आहे उडवून विखुरणाऱ्यां (वाऱ्यां) ची
فَٱلْحَـٰمِلَـٰتِ وِقْرًۭا
fal-ḥāmilāti wiq'ran
२. मग ओझे उचलणाऱ्यांची
فَٱلْجَـٰرِيَـٰتِ يُسْرًۭا
fal-jāriyāti yus'ran
३. मग धीम्या गतीने चालणाऱ्यांची
فَٱلْمُقَسِّمَـٰتِ أَمْرًا
fal-muqasimāti amran
४. मग कामाची वाटणी करणाऱ्यांची.
إِنَّمَا تُوعَدُونَ لَصَادِقٌۭ
innamā tūʿadūna laṣādiqun
५. निःसंशय, तुम्हाला जे वायदे दिले जातात (ते सर्व) खरे आहेत.
وَإِنَّ ٱلدِّينَ لَوَٰقِعٌۭ
wa-inna l-dīna lawāqiʿun
६. आणि निश्चितच न्याय होणार आहे.
وَٱلسَّمَآءِ ذَاتِ ٱلْحُبُكِ
wal-samāi dhāti l-ḥubuki
७. शपथ आहे, मार्ग राखणाऱ्या आकाशाची.
إِنَّكُمْ لَفِى قَوْلٍۢ مُّخْتَلِفٍۢ
innakum lafī qawlin mukh'talifin
८. निश्चितच तुम्ही विभिन्न गोष्टीत पडला आहात.
يُؤْفَكُ عَنْهُ مَنْ أُفِكَ
yu'faku ʿanhu man ufika
९. त्या (सत्या) पासून तोच फिरविला जातो, जो फिरविला गेला असावा.
قُتِلَ ٱلْخَرَّٰصُونَ
qutila l-kharāṣūna
१०. अटकळीच्या गोष्टी बोलणारे नष्ट केले गेले.
ٱلَّذِينَ هُمْ فِى غَمْرَةٍۢ سَاهُونَ
alladhīna hum fī ghamratin sāhūna
११. जे चेतनाहीन आहेत आणि विसर पडलेले.
يَسْـَٔلُونَ أَيَّانَ يَوْمُ ٱلدِّينِ
yasalūna ayyāna yawmu l-dīni
१२. विचारतात की मोबदल्याचा दिवस केव्हा येईल?
يَوْمَ هُمْ عَلَى ٱلنَّارِ يُفْتَنُونَ
yawma hum ʿalā l-nāri yuf'tanūna
१३. (होय) हा तो दिवस आहे की हे आगीवर तापविले जातील.
ذُوقُوا۟ فِتْنَتَكُمْ هَـٰذَا ٱلَّذِى كُنتُم بِهِۦ تَسْتَعْجِلُونَ
dhūqū fit'natakum hādhā alladhī kuntum bihi tastaʿjilūna
१४. स्वाद चाखा. हेच ते, ज्याची तुम्ही घाई माजवित होते.
إِنَّ ٱلْمُتَّقِينَ فِى جَنَّـٰتٍۢ وَعُيُونٍ
inna l-mutaqīna fī jannātin waʿuyūnin
१५. निःसंशय, अल्लाहचे भय बाळगणारे जन्नतींमध्ये आणि (शीतल) झऱ्यांमध्ये असतील.
ءَاخِذِينَ مَآ ءَاتَىٰهُمْ رَبُّهُمْ ۚ إِنَّهُمْ كَانُوا۟ قَبْلَ ذَٰلِكَ مُحْسِنِينَ
ākhidhīna mā ātāhum rabbuhum innahum kānū qabla dhālika muḥ'sinīna
१६. त्यांच्या पालनकर्त्याने जे काही त्यांना प्रदान केले आहे, ते घेत असतील ते तर त्यापूर्वीच सत्कर्म करणारे होते.
كَانُوا۟ قَلِيلًۭا مِّنَ ٱلَّيْلِ مَا يَهْجَعُونَ
kānū qalīlan mina al-layli mā yahjaʿūna
१७. ते रात्री फार कमी झोपत असत.
وَبِٱلْأَسْحَارِ هُمْ يَسْتَغْفِرُونَ
wabil-asḥāri hum yastaghfirūna
१८. आणि ते रात्रीच्या अंतिम प्रहरी (पहाटे) क्षमा - याचना करीत.
وَفِىٓ أَمْوَٰلِهِمْ حَقٌّۭ لِّلسَّآئِلِ وَٱلْمَحْرُومِ
wafī amwālihim ḥaqqun lilssāili wal-maḥrūmi
१९. आणि त्यांच्या धन-संपत्तीत याचकांचा(मागणाऱ्यांचा)आणि याचना करण्यापासून अलिप्त राहणाऱ्यांचा हक्क होता.
وَفِى ٱلْأَرْضِ ءَايَـٰتٌۭ لِّلْمُوقِنِينَ
wafī l-arḍi āyātun lil'mūqinīna
२०. आणि विश्वास राखणाऱ्यांकरिता तर धरतीत अनेक निशाण्या आहेत.
وَفِىٓ أَنفُسِكُمْ ۚ أَفَلَا تُبْصِرُونَ
wafī anfusikum afalā tub'ṣirūna
२१. आणि स्वतः तुमच्या अस्तित्वात देखील, तर काय तुम्ही पाहत नाहीत?
وَفِى ٱلسَّمَآءِ رِزْقُكُمْ وَمَا تُوعَدُونَ
wafī l-samāi riz'qukum wamā tūʿadūna
२२. आणि तुमची आजिविका(अन्न सामुग्री) आणि जो तुम्हाला वायदा दिला जात आहे, सर्व आकाशात आहे.
فَوَرَبِّ ٱلسَّمَآءِ وَٱلْأَرْضِ إِنَّهُۥ لَحَقٌّۭ مِّثْلَ مَآ أَنَّكُمْ تَنطِقُونَ
fawarabbi l-samāi wal-arḍi innahu laḥaqqun mith'la mā annakum tanṭiqūna
२३. तेव्हा आकाश आणि धरतीच्या स्वामी व पालनकर्त्याची शपथ! हे अगदी सत्य आहे, असेच खात्रीपूर्वक, जसे तुम्ही बोलता.
هَلْ أَتَىٰكَ حَدِيثُ ضَيْفِ إِبْرَٰهِيمَ ٱلْمُكْرَمِينَ
hal atāka ḥadīthu ḍayfi ib'rāhīma l-muk'ramīna
२४. काय तुम्हाला इब्राहीम (अलैहिस्सलाम) च्या सन्मानित अतिथींची वार्ताही पोहचली आहे?
إِذْ دَخَلُوا۟ عَلَيْهِ فَقَالُوا۟ سَلَـٰمًۭا ۖ قَالَ سَلَـٰمٌۭ قَوْمٌۭ مُّنكَرُونَ
idh dakhalū ʿalayhi faqālū salāman qāla salāmun qawmun munkarūna
२५. ते जेव्हा त्यांच्याजवळ आले तेव्हा सलाम केला. (इब्राहीम) यांनी सलामला उत्तर दिले (आणि म्हणाले, हे तर) अनोळखी लोक आहेत.
فَرَاغَ إِلَىٰٓ أَهْلِهِۦ فَجَآءَ بِعِجْلٍۢ سَمِينٍۢ
farāgha ilā ahlihi fajāa biʿij'lin samīnin
२६. मग (गुपचुप घाईघाईने) आपल्या कुटुंबियांकडे गेले आणि एका लठ्ठ वासरुचे (मांस) घेऊन आले.
فَقَرَّبَهُۥٓ إِلَيْهِمْ قَالَ أَلَا تَأْكُلُونَ
faqarrabahu ilayhim qāla alā takulūna
२७. आणि ते त्यांच्या पुढे ठेवले आणि म्हणाले, तुम्ही खात का नाही?
فَأَوْجَسَ مِنْهُمْ خِيفَةًۭ ۖ قَالُوا۟ لَا تَخَفْ ۖ وَبَشَّرُوهُ بِغُلَـٰمٍ عَلِيمٍۢ
fa-awjasa min'hum khīfatan qālū lā takhaf wabasharūhu bighulāmin ʿalīmin
२८. मग मनातल्या मनात त्यांच्यापासून भयभित झाले. (अतिथी) म्हणाले, तुम्ही भिऊ नका आणि त्यांना (हजरत) इब्राहीमला एका ज्ञानी पुत्रप्राप्तीची शुभवार्ता दिली.
فَأَقْبَلَتِ ٱمْرَأَتُهُۥ فِى صَرَّةٍۢ فَصَكَّتْ وَجْهَهَا وَقَالَتْ عَجُوزٌ عَقِيمٌۭ
fa-aqbalati im'ra-atuhu fī ṣarratin faṣakkat wajhahā waqālat ʿajūzun ʿaqīmun
२९. तेव्हा त्यांच्या पत्नीने आश्चर्यचकित होऊन आपल्या तोंडावर हात मारून म्हटले की मी तर म्हातारी आहे, त्याचबरोबर वांझ देखील.
قَالُوا۟ كَذَٰلِكِ قَالَ رَبُّكِ ۖ إِنَّهُۥ هُوَ ٱلْحَكِيمُ ٱلْعَلِيمُ
qālū kadhāliki qāla rabbuki innahu huwa l-ḥakīmu l-ʿalīmu
३०. ते म्हणाले की होय, तुमच्या पालनकर्त्या (अल्लाह) ने असेच फर्माविले आहे. निःसंशय, तो हिकमशाली आणि जाणणारा आहे.
۞ قَالَ فَمَا خَطْبُكُمْ أَيُّهَا ٱلْمُرْسَلُونَ
qāla famā khaṭbukum ayyuhā l-mur'salūna
३१. (हजरत इब्राहीम अलै.) म्हणाले की अल्लाहने पाठविलेल्या (फरिश्त्यां) नो! तुमच्या (येण्याचा) हेतू काय?
قَالُوٓا۟ إِنَّآ أُرْسِلْنَآ إِلَىٰ قَوْمٍۢ مُّجْرِمِينَ
qālū innā ur'sil'nā ilā qawmin muj'rimīna
३२. त्यांनी उत्तर दिले की आम्ही अपराधी लोकांकडे पाठविले गेलो आहोत.
لِنُرْسِلَ عَلَيْهِمْ حِجَارَةًۭ مِّن طِينٍۢ
linur'sila ʿalayhim ḥijāratan min ṭīnin
३३. यासाठी की आम्ही त्याच्यावर (भाजलेल्या) मातीच्या दगडांचा वर्षाव करावा.
مُّسَوَّمَةً عِندَ رَبِّكَ لِلْمُسْرِفِينَ
musawwamatan ʿinda rabbika lil'mus'rifīna
३४. जे तुमच्या पालनकर्त्यातर्फे चिन्हांकित झाले आहेत त्या मर्यादा भंग करणाऱ्यांकरिता.
فَأَخْرَجْنَا مَن كَانَ فِيهَا مِنَ ٱلْمُؤْمِنِينَ
fa-akhrajnā man kāna fīhā mina l-mu'minīna
३५. तेव्हा जेवढे ईमान राखणारे तिथे होते, आम्ही त्यांना तेथून काढले.
فَمَا وَجَدْنَا فِيهَا غَيْرَ بَيْتٍۢ مِّنَ ٱلْمُسْلِمِينَ
famā wajadnā fīhā ghayra baytin mina l-mus'limīna
३६. आणि आम्हाला तिथे मुसलमानांचे फक्त एकच घर आढळले.
وَتَرَكْنَا فِيهَآ ءَايَةًۭ لِّلَّذِينَ يَخَافُونَ ٱلْعَذَابَ ٱلْأَلِيمَ
wataraknā fīhā āyatan lilladhīna yakhāfūna l-ʿadhāba l-alīma
३७. आणि आम्ही तिथे त्यांच्यासाठी, जे दुःखदायक शिक्षा यातनेचे भय बाळगतात, एक पूर्ण चिन्ह सोडले.
وَفِى مُوسَىٰٓ إِذْ أَرْسَلْنَـٰهُ إِلَىٰ فِرْعَوْنَ بِسُلْطَـٰنٍۢ مُّبِينٍۢ
wafī mūsā idh arsalnāhu ilā fir'ʿawna bisul'ṭānin mubīnin
३८. आणि मूसाच्या वृत्तांतात (ही आमच्यातर्फे तंबी आहे) जेव्हा आम्ही त्यांना फिरऔनकडे स्पष्ट प्रमाणासह पाठविले.
فَتَوَلَّىٰ بِرُكْنِهِۦ وَقَالَ سَـٰحِرٌ أَوْ مَجْنُونٌۭ
fatawallā biruk'nihi waqāla sāḥirun aw majnūnun
३९. तेव्हा त्याने आपल्या सामर्थ्याच्या घमेंडीत तोंड फिरविले, आणि म्हणाले, हा (एकतर) जादूगार आहे किंवा वेडसर आहे.
فَأَخَذْنَـٰهُ وَجُنُودَهُۥ فَنَبَذْنَـٰهُمْ فِى ٱلْيَمِّ وَهُوَ مُلِيمٌۭ
fa-akhadhnāhu wajunūdahu fanabadhnāhum fī l-yami wahuwa mulīmun
४०. शेवटी आम्ही त्याला आणि त्याच्या सैन्याला आपल्या शिक्षा-यातनेत धरून, समुद्रात टाकले. तो होताच निर्भर्त्सना करण्यायोग्य.
وَفِى عَادٍ إِذْ أَرْسَلْنَا عَلَيْهِمُ ٱلرِّيحَ ٱلْعَقِيمَ
wafī ʿādin idh arsalnā ʿalayhimu l-rīḥa l-ʿaqīma
४१. त्याचप्रमाणे आदच्या लोकांमध्येही (आमच्यातर्फे तंबी आहे) जेव्हा आम्ही त्यांच्यावर वांझ (अशुभ) वादळ पाठविले.
مَا تَذَرُ مِن شَىْءٍ أَتَتْ عَلَيْهِ إِلَّا جَعَلَتْهُ كَٱلرَّمِيمِ
mā tadharu min shayin atat ʿalayhi illā jaʿalathu kal-ramīmi
४२. ते ज्या ज्या वस्तूवरून गेले, तिला जीर्ण हाडांप्रमाणे चूरेचूर करून टाकले.
وَفِى ثَمُودَ إِذْ قِيلَ لَهُمْ تَمَتَّعُوا۟ حَتَّىٰ حِينٍۢ
wafī thamūda idh qīla lahum tamattaʿū ḥattā ḥīnin
४३. आणि समूद (च्या वृत्तांता) मध्येही (बोध) आहे, जेव्हा त्यांना सांगितले गेले की तुम्ही काही दिवसापर्यंत लाभ प्राप्त करून घ्या.
فَعَتَوْا۟ عَنْ أَمْرِ رَبِّهِمْ فَأَخَذَتْهُمُ ٱلصَّـٰعِقَةُ وَهُمْ يَنظُرُونَ
faʿataw ʿan amri rabbihim fa-akhadhathumu l-ṣāʿiqatu wahum yanẓurūna
४४. परंतु त्यांनी आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाचे पालन केले नाही, ज्याबद्दल त्यांना एका भयंकर गर्जनेने नष्ट करून टाकले आणि ते बघतच राहिले.
فَمَا ٱسْتَطَـٰعُوا۟ مِن قِيَامٍۢ وَمَا كَانُوا۟ مُنتَصِرِينَ
famā is'taṭāʿū min qiyāmin wamā kānū muntaṣirīna
४५. मग ना तर ते उभे राहू शकले, आणि ना सूड घेऊ शकले.
وَقَوْمَ نُوحٍۢ مِّن قَبْلُ ۖ إِنَّهُمْ كَانُوا۟ قَوْمًۭا فَـٰسِقِينَ
waqawma nūḥin min qablu innahum kānū qawman fāsiqīna
४६. आणि नूह (अलै.) यांच्या जनसमूहाची देखील याच्या आधी (हीच अवस्था झाली होती) ते देखील मोठे अवज्ञाकारी लोक होते.
وَٱلسَّمَآءَ بَنَيْنَـٰهَا بِأَيْي۟دٍۢ وَإِنَّا لَمُوسِعُونَ
wal-samāa banaynāhā bi-aydin wa-innā lamūsiʿūna
४७. आणि आकाशाला आम्ही (आपल्या) हातांनी बनविले आहे आणि निःसंशय, आम्ही व्यापक करणारे आहोत.
وَٱلْأَرْضَ فَرَشْنَـٰهَا فَنِعْمَ ٱلْمَـٰهِدُونَ
wal-arḍa farashnāhā faniʿ'ma l-māhidūna
४८. आणि जमिनीला आम्ही बिछाईत बनविले आहे, तेव्हा आम्ही किती चांगले बिछाईत करणारे आहोत.
وَمِن كُلِّ شَىْءٍ خَلَقْنَا زَوْجَيْنِ لَعَلَّكُمْ تَذَكَّرُونَ
wamin kulli shayin khalaqnā zawjayni laʿallakum tadhakkarūna
४९. आणि प्रत्येक वस्तूला आम्ही जोडी जोडीने निर्माण केले आहे,१ यासाठी की तुम्ही बोध ग्रहण करावा.
فَفِرُّوٓا۟ إِلَى ٱللَّهِ ۖ إِنِّى لَكُم مِّنْهُ نَذِيرٌۭ مُّبِينٌۭ
fafirrū ilā l-lahi innī lakum min'hu nadhīrun mubīnun
५०. तेव्हा तुम्ही अल्लाहकडे धाव घ्या. निःसंशय, मी तुम्हाला त्याच्यातर्फे खबरदार करणारा आहे.
وَلَا تَجْعَلُوا۟ مَعَ ٱللَّهِ إِلَـٰهًا ءَاخَرَ ۖ إِنِّى لَكُم مِّنْهُ نَذِيرٌۭ مُّبِينٌۭ
walā tajʿalū maʿa l-lahi ilāhan ākhara innī lakum min'hu nadhīrun mubīnun
५१. आणि अल्लाहसोबत दुसऱ्या कोणालाही उपास्य (दैवत) बनवू नका, निश्चितच, मी तुम्हाला त्याच्यातर्फे स्पष्टतः सावध करणारा आहे.
كَذَٰلِكَ مَآ أَتَى ٱلَّذِينَ مِن قَبْلِهِم مِّن رَّسُولٍ إِلَّا قَالُوا۟ سَاحِرٌ أَوْ مَجْنُونٌ
kadhālika mā atā alladhīna min qablihim min rasūlin illā qālū sāḥirun aw majnūnun
५२. अशाच प्रकारे जे लोक त्यांच्या पूर्वी होऊन गेलेत, त्यांच्याजवळ जो देखील पैगंबर आला, त्याला ते म्हणाले की एकतर हा जादूगार आहे किंवा वेडा!
أَتَوَاصَوْا۟ بِهِۦ ۚ بَلْ هُمْ قَوْمٌۭ طَاغُونَ
atawāṣaw bihi bal hum qawmun ṭāghūna
५३. काय हे, या गोष्टीची एकमेकांना ताकीद करत गेलेत, नव्हे, किंबहुना हे सर्व विद्रोही (उन्मत्त) लोक आहेत.
فَتَوَلَّ عَنْهُمْ فَمَآ أَنتَ بِمَلُومٍۢ
fatawalla ʿanhum famā anta bimalūmin
५४. तेव्हा तुम्ही त्यांच्याकडून तोंड फिरवून घ्या, तुमच्यावर कसलाही दोषारोप नाही.
وَذَكِّرْ فَإِنَّ ٱلذِّكْرَىٰ تَنفَعُ ٱلْمُؤْمِنِينَ
wadhakkir fa-inna l-dhik'rā tanfaʿu l-mu'minīna
५५. आणि उपदेश करीत राहा, निःसंशय हा उपदेश ईमान राखणाऱ्यांना लाभ देईल.
وَمَا خَلَقْتُ ٱلْجِنَّ وَٱلْإِنسَ إِلَّا لِيَعْبُدُونِ
wamā khalaqtu l-jina wal-insa illā liyaʿbudūni
५६. मी जिन्नांना आणि मानवांना फक्त अशासाठी निर्माण केले आहे की त्यांनी केवळ माझी उपासना करावी.१
مَآ أُرِيدُ مِنْهُم مِّن رِّزْقٍۢ وَمَآ أُرِيدُ أَن يُطْعِمُونِ
mā urīdu min'hum min riz'qin wamā urīdu an yuṭ'ʿimūni
५७. त्यांच्याकडून मी ना आजिविका (रोजी) इच्छितो ना असे इच्छितो की त्यांनी मला खाऊ घालावे.
إِنَّ ٱللَّهَ هُوَ ٱلرَّزَّاقُ ذُو ٱلْقُوَّةِ ٱلْمَتِينُ
inna l-laha huwa l-razāqu dhū l-quwati l-matīnu
५८. निःसंशय, अल्लाह स्वतः रोजी देणारा सामर्थ्यशाली व बलवान आहे.
فَإِنَّ لِلَّذِينَ ظَلَمُوا۟ ذَنُوبًۭا مِّثْلَ ذَنُوبِ أَصْحَـٰبِهِمْ فَلَا يَسْتَعْجِلُونِ
fa-inna lilladhīna ẓalamū dhanūban mith'la dhanūbi aṣḥābihim falā yastaʿjilūni
५९. तेव्हा ज्या लोकांनी अत्याचार केला आहे, त्यांनाही त्यांच्या साथीदारांच्या हिश्श्याइतकाच हिस्सा मिळेल, यास्तव त्यांनी माझ्याशी घाईने मागू नये.
فَوَيْلٌۭ لِّلَّذِينَ كَفَرُوا۟ مِن يَوْمِهِمُ ٱلَّذِى يُوعَدُونَ
fawaylun lilladhīna kafarū min yawmihimu alladhī yūʿadūna
६०. तेव्हा दुर्दशा आहे काफिरांसाठी, त्यांच्या त्या दिवशी ज्याचा त्यांना वायदा दिला जात आहे.